महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम योजनेतंर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक शेतजमीनीवर फळबाग लागवड
शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे
असलेल्या शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच
शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या कृषि
विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन
देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड
योजना राबविण्यात येत आहे.
राज्यात फळबाग योजनेला
प्रोत्साहन देण्यासाठी नवीन फळ पिके व फुल पिके यांचा महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार हमी योजनेत समावेश करण्यात आला आहे.
या योजनेत लाभार्थींनी क्षेत्र परिस्थितीनुसार
लागवडीचे अंतर कमी जास्त करण्यास परवानगी आहे. परंतु देय अनुदान फळपीक लागवडीचे
निकष कृषि विद्यापीठ शिफारसीनुसार अंतर मर्यादेतच देय राहते. अतिरीक्त कलमे रोपे
यांचे अनुदान देय नसते. लागवड वर्षासह सलग तीन वर्षात मंजूर अंदाजपत्रानुसार
अनुदान देय राहते. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती वृक्ष पिकांच्या बाबत जे
लाभार्थी कमीत कमी 90 टक्के आणि कोरडवाहू
वृक्षपिकांच्या बाबत किमान 75 टक्के झाडे रोपे
जिवंत ठेवतील, अशाच लाभार्थींना
दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील.
समाविष्ठ
फळपिक :१) आंबा २) काजू ३) चिकू ४) पेरु ५) डाळिंब ६) संत्रा ७) मोसंबी ८) कागदी
लिंबू ९) नारळ १०) बोर ११)सिताफळ १२) आवळा १३) चिंच (विकसीत जाती) १४) कवठ १५)
जांभुळ १६) कोकम १७) फणस १८) अंजीर १९) सुपारी २०) बांबू २१) साग २२) जड्रोफा २३)
गिरीपुष्प २४) कडीपत्ता २५) कडूलिंब २६) सिंधी २७) शेवगा २८) हदगा २९) पानपिंपरी
३०) केळी (३ वर्ष) ३१) ड्रॅगनफुट ३२) अॅव्हाकॅडो ३३) द्राक्ष ३४) चंदन ३५) खाया
३६) निम ३७) चारोली ३८) महोगनी ३९) बाभूळ ४०) अंजन ४१) खैर ४२) ताड ४३) सुरु ४४)
रबर ४५) महारुख ४६) मँजियम ४७) मेलिया डुबिया ४८) तुती (मलबेरी) ४९) ऐन ५०) शिसव
५१) निलगिरी ५२) सुबाभुळ ५३)शेमी ५४) महुआ ५५) गुलमोहर ५६) बकान निब ५७) चिनार ५८)
शिरीष ५९) करवंदआदि फळ पिके
फुलझाड - १) गुलाब २) मोगरा ३) निशीगंध ४) सोनचाफा
औषधी वनस्पती - १) अर्जुन, २) असान, ३) अशोका, ४) बेहडा, ५) हिरडा, ६) बेल, ७) टेटु, ८) डिकेमाली, ९) रक्तचंदन, १०) रिठा, ११) लोध्रा, १२) आइन, १३) शिवन, १४) गुग्गुळ, १५) बिब्बा १६) करंज
मसाल्याची पिके - १) लवंग, २) दालचिनी,३) मिरी ४) जायफळ
लाभार्थीचे
निकष : कमीत कमी 0.05 हे. व जास्तीत
जास्त 2.0 हे. प्रति लाभार्थी क्षेत्र
मर्यादा राहील. इच्छुक लाभधारकाच्या नावे
जमीन असणे आवश्यक आहे. जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास व 7/12 च्या उताऱ्यावर कुळाचे नाव असेल तर योजना राबवत
असताना कुळाची संमती आवश्यक आहे.
अ) लाभार्थी पात्रता-
- अनुसुचित
जाती (Schedule
Caste)
- अनुसुचित
जमाती (Schedule
Tribes)
- भटक्या
जमाती (Nomadic
Tribes)
- निरधिसुचीत
जमाती (विमुक्त जमाती De-notified
Tribes)
- दारिद्र
रेषेखालील इतर कुटुंबे (Families
below the poverty line)
- स्त्री
कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे (Women-headed households)
- दिव्यांग
व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे (physically handicapped headed households)
- जमीन
सुधारणांचे लाभार्थी (
benificiaries of land reforms)
- प्रधान
मंत्री आवास योजना - ग्रामीण योजने खालील लाभार्थी (benificiaries under the Pradhan Mantri Awaas Yojana)
- अनुसुचित
जमातीचे व इतर पारंपारिक वननिवासी (वन हक्के मान्य करणे) अधिनियम 200६ (२००७ चा २) खालील पात्र लाभार्थी (benificiaries
under Schedule Tribes and
other Traditionl
Forest Dwellers )
उपरोक्त प्रवर्गामधील (अ) ते (ज) पात्र
लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर, कृषि कर्ज माफी योजना, 2008 यामध्ये व्याख्या केलेला अल्पधारक [1 हेक्टरपेक्षा
जास्त पण 2 हेक्टर (5 एकर) पर्यंत
जमीन असलेले शेतकरी (जमीन मालक किंवा कूळ)] व सीमांत भूधारक शेतकरी [1 हेक्टर पर्यंत जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक किंवा कूळ)] यांच्या
जमिनीवरील कामांना शर्तीच्या अधिनतेने प्राधान्य देण्यात यावे. महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी जॉब कार्ड धारक वरील अ ते ज प्रवर्गातील
कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
ब ) अर्ज कुठे करावा- तालुका कृषि
अधिकारी कार्यालय
क) कलमे / रोपे खरेदी कोठून करावीत
- कृषि
विभागाच्या रोपवाटिका
- कृषि विद्यापिठांच्या रोपवाटिका
- खाजगी शासन मान्यता प्राप्त (पंजीकृत) रोपवाटिका
- सामाजिक वनीकरण विभाग किंवा अन्य शासकीय विभाग
रोपवाटिका.
- परवानाधारक खाजगी रोपवाटिकेतून रोपे/कलमे खरेदी
करण्याची गरज पडल्यास आयुक्त कृषी द्वारे लागू केलेल्या दरात ते कलमे/रोपे
खरेदी करता येईल.
- कलमे रोपे उपलब्धतेबाबतच्या अद्यावत माहितीसाठी National nuursery portal चे nnp.nhb.gov.in संकेत स्थळाचा वापर करण्यात यावा.
ड ) योजनेत समाविष्ट फळपिके / वृक्ष-
१) आंबा २) काजू ३) चिकू ४) पेरु ५) डाळिंब ६) संत्रा ७) मोसंबी ८)
कागदी लिंबू ९) नारळ १०) बोर ११)सिताफळ १२) आवळा १३) चिंच (विकसीत जाती) १४) कवठ
१५) जांभुळ १६) कोकम १७) फणस १८) अंजीर १९) सुपारी २०) बांबू २१) साग २२) जड्रोफा
२३) गिरीपुष्प २४) कडीपत्ता २५) कडूलिंब २६) सिंधी २७) शेवगा २८) हदगा २९)
पानपिंपरी ३०) केळी (३ वर्ष) ३१) ड्रॅगनफुट ३२) अॅव्होकाडो (Avocado) ३३) द्राक्ष ३४) चंदन
३५) खाया ३६) निम ३७) चारोली ३८) महोगनी ३९) बाभूळ ४०) अंजन ४१) खैर ४२) ताड ४३)
सुरु ४४) रबर ४५) महारुख ४६) मँजियम ४७) मेलिया डुबिया ४८) तुती (मलबेरी) ४९) ऐन
५०) शिसव ५१) निलगिरी ५२) सुबाभुळ ५३)शेमी ५४) महुआ ५५) गुलमोहर ५६) बकान निब ५७)
चिनार ५८) शिरीष ५९) करवंद
फुलझाड - १) गुलाब २) मोगरा ३) निशीगंध ४) सोनचाफा
औषधी वनस्पती -
१) अर्जुन, २) असान, ३) अशोका, ४) बेहडा, ५) हिरडा, ६) बेल, ७) टेटु, ८) डिकेमाली, ९) रक्तचंदन, १०) रिठा, ११) लोध्रा, १२) आइन, १३) शिवन, १४) गुग्गुळ, १५) बिब्बा १६) करंज
मसाल्याची पिके - १) लवंग, २) दालचिनी,३) मिरी ४) जायफळ
इ) लागवड कालावधी - जून ते नोव्हेंबर
अल्प व अत्यल्प
लाभार्थी, महिला लाभार्थी, दिव्यांग व्यक्ती कुटूंब प्रमुख असलेल्या कुटुंबियांना तसेच
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती,
निरधिसूचित
जमाती, दारिद्र्य रेषेखालील
व्यक्तीस व पंतप्रधान आवास योजनेला प्राधान्य राहील. लाभार्थी शाश्वत उत्पन्नाची
साधने उपलब्ध नसावीत. तसेच तो नोकरदार व्यक्ती नसावा. लाभार्थी ऑनलाईन रोजगार
कार्डधारक असावा. लाभार्थीस ग्रामसभेची मंजुरी असावी व ग्रामपंचायत लेबर बजेटमध्ये
त्याचा समावेश असावा व ग्रामसभेचा ठराव आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी
पात्र इच्छुकांनी अधिक माहितीसाठी सहायक कृषि अधिकारी, उप कृषी अधिकारी,
मंडळ
कृषी अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा