कृषी विभाग, सिंधुदुर्ग (महाराष्ट्र शासन)

हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे

आपल्या जिल्ह्याची  शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी हमखास सिंचन सुविधा शेतकऱ्यांकडे असावी  लागते. त्यामुळे कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे.

या शेततळ्यातील पाण्याचा वापर करुन फळबाग, फुलशेती, भाजीपाला यासारखी पिके घेऊन हमखास उत्पन्न मिळवणे शेतकऱ्यांना सहज शक्य होते.

लाभार्थी पात्रता निकष :

कोकण विभागासाठी जमीन धारणा अट शिथिल केलेली असून अर्जदार शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर किमान 0.20 हेक्टर क्षेत्र आवश्यक आहे. हीच जमीनधारणा अट उर्वरीत महाराष्ट्रासाठी 0.60 हे. आहे. शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. अर्जदाराने यापूर्वी शासकीय योजनेतून शेततळे या घटकाचा लाभ घेतलेला नसावा.

आवश्यक कागदपत्रे :

जमीनीचा सात-बारा आणि 8-अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, हमीपत्र आणि जातीचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

लाभार्थी निवड :

शेतकऱ्यांनी http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळ CSC केंद्रावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करतेवेळी महाडीबीटी प्रणालीवर with inlet-outlet/without inlet-outlet यापैकी एका बाबीची निवड करावी. सर्वसाधारण क्षेत्र व डोंगराळ क्षेत्रासाठी अनुदान मर्यादा वेगवेगळी असल्याने यापैकी आपले क्षेत्र कोणत्या भागात आहे त्यानुसार योग्य क्षेत्राची निवड करावी. महाडीबीटी ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त अर्जातून संगणकीय प्रणालीद्वारे सोडतीने निवड होईल.

आकारमान व अनुदान :

. क्र.

आकारमान (मी.)

(बाजु उतार 1:1)

यंत्राद्वारे इनलेट/आऊटलेट खोदाई व सिल्ट ट्रॅपसह शेततळे अनुदान रक्कम (रु.)

यंत्राद्वारे इनलेट/आऊटलेट खोदाई व सिल्ट ट्रॅप विरहीत शेततळे अनुदान रक्कम (रु.)

सर्वसाधारण क्षेत्र 

डोंगराळ क्षेत्र

सर्वसाधारण क्षेत्र 

डोंगराळ क्षेत्र

1

15X15X3

23,881

26,010

18,621

20,235

2

20X15X3

32,034

34,821

26,774

29,046

3

20X20X3

43,678

47,398

38,417

41,623

4

25X20X3

55,321

59,974

50,061

54,199

5

25X25X3

70,455

75,000

65,194

70,540

6

30X25X3

75,000

75,000

75,000

75,000

7

30X30X3

75,000

75,000

75,000

75,000

8

34X34X3

75,000

75,000

75,000

75,000

 

विशेष सूचना :

शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरीकरण करण्यासाठी सुद्धा या योजनेमध्ये तरतूद असून  प्लास्टीक अस्तरीकरण किंमतीच्या 50 टक्के अथवा 75 हजार रुपये याप्रमाणे अनुदान उपलब्ध आहे. आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे.

लाभार्थ्यांची जबाबदारी :

कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक राहील. कार्यारंभ आदेश किंवा पूर्वसंमती पत्र मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील.

 शेततळ्यासाठी online पद्धतीने अर्ज करताना अधिक माहितीकरिता संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रीय अन्नधान्य पिके आणि पोषण सुरक्षा

  राष्ट्रीय अन्नधान्य पिके आणि पोषण सुरक्षा