कृषी विभाग, सिंधुदुर्ग (महाराष्ट्र शासन)

हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

प्रधानमंत्री कृषि सिंचन व मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना - सूक्ष्म सिंचन

प्रधानमंत्री कृषि सिंचन  व मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना

उद्देश :-

  • पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे.

  • सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढवणे.


योजनेची सुरुवात:-

  • १९८६-८७ पासून राज्य पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेची राज्यात सुरुवात झाली.

  • २००५-०६ पासून केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेची सुरुवात झाली.

  • २०१०-११ ते २०१३-१४ या कालावधीमध्ये राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियाना अंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात आली.

  • २०१२-१३ ते २०१५-१६ या कालावधीमध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम राबविण्यात आला.

  • राष्ट्रीय शाश्वत शेती अभियाना अंतर्गत शेतावरील पाणी व्यवस्थापन हे उपअभियान २०१४-१५ मध्ये राबविण्यात आले.

  • २०१५-१६ पासून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना- प्रती थेंब अधिक पीक योजना राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत होती.

  • २०२२-२३ पासून सदर योजना राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत प्रती थेंब अधिक पीक या घटकांतर्गत राबविण्यात येत आहे.

  • योजनेचे स्वरूप व अंमलबजावणी

  • योजनेची व्याप्ती

    • राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे.


    अर्थसाहाय्य

    • केंद्र शासनाचा वाटा: ६० टक्के

    • राज्य शासनाचा वाटा: ४० टक्के


    अनुदान मर्यादा

    • अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना: ५५ टक्के अनुदान

    • इतर शेतकऱ्यांना: ४५ टक्के अनुदान

    • हे अनुदान ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देय आहे.


    योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता आज्ञावली (पोर्टल)

    • सन २०१२-१३ पासून सन २०१९-२० पर्यंत ई-ठिबक आज्ञावलीद्वारे शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यात येत होता.

    • सन २०२०-२१ पासून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज स्वीकारण्यात येतात.

    • संकेतस्थळ (Website): https://mahadbtmahait.gov.in/


    लाभार्थी पात्रता

    • शेतकऱ्याच्या मालकी हक्काचा ७/१२ आणि ८-अ उतारा आवश्यक.

    • सूक्ष्म सिंचन घटकाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी.

    • सोडतीनंतर व पूर्वसंमतीनंतर सादर करावयाची कागदपत्रे

      सोडतीनंतर प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे

      • मालकी हक्काचा ७/१२ उतारा

      • ८-अ उतारा

      • टीप: सोडतीमध्ये निवड झाल्यानंतर प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाहीबाबत लाभधारकास SMS द्वारे कळविण्यात येते.


      पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर सादर करावयाची कागदपत्रे

      • सूक्ष्म सिंचन संचाचा आराखडा

      • कंपनीच्या अधिकृत वितरकाने स्वाक्षरीत केलेले बील

      • शेतकऱ्याचे स्वयं घोषणापत्र (हमीपत्र)


      अंमलबजावणी व अनुदान अदायगी

      • पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर लाभधारकास ३० दिवसांच्या आत सूक्ष्म सिंचन संच बसविणे आवश्यक आहे.

      • मोका तपासणी झाल्यानंतर अनुदान परिगणना करून तालुका कृषि अधिकारी अनुदान अदायगीसाठी जिल्हास्तरावर सादर करतात.


      अनुदानाचा लाभ पुन्हा घेण्याबाबतची अट

      • शासनाच्या निर्णयानुसार (शा.नि. क्र. प्रकृसि.०११९/प्रक्र.४१/१४ अ, दि. २४.फेब्रुवारी.२०२१), शेतकऱ्याने एखाद्या क्षेत्रावर यापूर्वी सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेतला असेल, तर त्याच क्षेत्रावर ७ वर्षांच्या कालावधीनंतर सूक्ष्म सिंचन घटकास अनुदानाचा लाभ अनुज्ञेय आहे.

 

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतर्गत मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना

पूरक अनुदान

शासन निर्णय: दि. १९.०८.२०१९

विषय: प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतर्गत् लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना पूरक अनुदान घोषित करणे.


कार्यक्षेत्र (लागू असलेले प्रदेश)

पूरक अनुदानाचा लाभ खालील क्षेत्रांतील लाभार्थ्यांना देय आहे:

  • अवर्षण प्रवण घोषित १४९ तालुके

  • अमरावती व औरंगाबाद महसूल विभागातील सर्व जिल्हे

  • नागपूर विभागातील वर्धा जिल्हा

  • नक्षलग्रस्त घोषित चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्हे

पूरक अनुदानाचे स्वरूप

लाभार्थी प्रवर्गमूळ अनुदान (टक्के)पूरक अनुदान (टक्के)एकूण देय अनुदान (टक्के)
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी५५%२५%८०%
इतर शेतकरी४५%३०%७५%


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रीय अन्नधान्य पिके आणि पोषण सुरक्षा

  राष्ट्रीय अन्नधान्य पिके आणि पोषण सुरक्षा