महाराष्ट्र शासन
कृषी विभाग
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन २०२५-२६
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन सन २०२५-२६ मध्ये राज्यात राबविण्यात येत असून, त्यामध्ये खालील नमूद फळबागांच्या लागवडीसाठी शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
|
अ. क्र. |
फळपीक |
अंतर (मी.) |
हेक्टरची संख्या |
प्रतिहेक्टरी कमाल अनुदान मर्यादा
(रु.) |
|
१ |
आंबा कलम |
१० x १० |
१०० |
७१९९७ |
|
२ |
आंबा कलम (सघन लागवड) |
५ x ५ |
४०० |
१४००१० |
|
३ |
काजू कलम |
७ x ७ |
२०० |
७१८२७ |
|
४ |
पेरू कलम (सघन लागवड) |
३ x २ |
१६६६ |
२३३८२९ |
|
५ |
पेरू कलम |
६ x ६ |
२७७ |
७७६९२ |
|
६ |
डाळिंब कलम |
४.५ x ३ |
७४० |
१२६३२१ |
|
७ |
कागदी लिंबू रोपे |
६ x ६ |
२७७ |
७४३१७ |
|
८ |
संत्रा, मोसंबी कलम |
६ x ६ |
२७७ |
८९२७५ |
|
९ |
संत्राकलम (इंडो-इज्रायली
तंत्रज्ञान) |
६ x ३ |
५५५ |
१३२५९५ |
|
१० |
नारळ रोपे बाणवली पिशवीसहित |
८ x ८ |
१५० |
१०५६९७ |
|
११ |
नारळ रोपे बाणवली पिशवीविरहित |
८ x ८ |
१५० |
८२२९७ |
|
१२ |
नारळ रोपे टी x डी बाणवली पिशवीसहित |
८ x ८ |
१५० |
१०५६९७ |
|
१३ |
नारळ रोपे टी x डी पिशवीविरहित |
८ x ८ |
१५० |
८७६९७ |
|
१४ |
सीताफळ |
५ x ५ |
४०० |
९१२५१ |
|
१५ |
आवळा |
७ x ७ |
२०० |
६३६४० |
|
१६ |
चिंच |
१० x १० |
१०० |
६१३७७ |
|
१७ |
जांभूळ |
१० x १० |
१०० |
६१३७७ |
|
१८ |
कोकम |
७ x ७ |
२०० |
६२३६५ |
|
१९ |
फणस |
१० x १० |
१०० |
५८८५२ |
|
२० |
अंजीर |
४.५ x ३ |
७४० |
१२६८७२ |
|
२१ |
चिकू कलम |
१० x १० |
१०० |
६९०८७ |
योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे राहतील:
- सर्व प्रवर्ग अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे, त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांना विचारात घेण्यात येईल (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी व अज्ञान व्यक्ती).
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या (MREGS) योजनेचा प्रथम फायदा घेतल्यानंतर उर्वरित क्षेत्रासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमधून लाभ घेता येईल.
- महाडीबीटीवर प्राप्त झालेल्या अर्जामधून सर्वसाधारण, अनु. जाती, अनु. जमाती, महिला व दिव्यांग व्यक्तींची निवड करण्यात येईल.
- योजनेअंतर्गत फळबाग लागवडीकरिता किमान ०.१० हे. ते कमाल १०.०० हे. क्षेत्र मर्यादा अनुज्ञेय राहील.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कृषी विद्यापीठांनी कृषी हवामान क्षेत्राकरिता शिफारस केलेल्या फळपिकांच्या वाणांची व उपरोक्त तक्त्यात नमूद फळपिकांच्या अंतराच्या शिफारशीनुसार फळबागेची लागवड करणे बंधनकारक राहील.
- योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या वरील कलमे व रोपांना अनुदान देय राहील.
- फळपिकांची कलमे/रोपे प्राधान्याने शासकीय, कृषी विद्यापीठ, राष्ट्रीय संशोधन संस्था व राष्ट्रीय बागेवानी मंडळ मानके रोपेवाटिका, कृषी विभागाच्या परवानगीधारक खाजगी रोपेवाटिकेतूनच घेणे बंधनकारक राहील.
- राष्ट्रीय बागवानी मंडळ मानके रोपेवाटिकेंमधील कलमे/रोपांच्या गुणवत्तेची जबाबदारी संबंधित रोपेवाटिका धारकांची राहील. सदर रोपेवाटिकेतून लाभार्थ्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर कलमे/रोपे खरेदी करावीत. तथापि, कलमे/रोपांचे अनुदान लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल.
- सदर योजनेसाठी ठिबक संचचे आयुष्यमान किमान ४ वर्षे बाकी असेल, तसेच अस्तित्वात असणारा संच हा नवीन फळबाग लागवडीच्या अंतरासाठी योग्य असेल तरच बाब विचारात घेऊन त्या ठिकाणी आवश्यकता राहणार नाही.
- फळबाग लागवडीच्या अनुदानाची रक्कम पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अनुक्रमे ५०, ३० व २० टक्के प्रमाणात लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात अदा करण्यात येईल.
- उपरोक्त फळपिकांच्या बागांची लागवड करण्याकरिता शेतकऱ्यांनी पूर्वसंमती मिळाल्यापासून ७५ दिवसांच्या कालावधीत फळझाडांची उचल व लागवड करणे बंधनकारक आहे.
- योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी सोबतीनंतर दोन दिवसांत ७/१२ व ८ अ उतारा, संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र, हमीपत्र, आधारकार्ड प्रत, जातीचे प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमाती), आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत (फोटोसहित) ही कागदपत्रे महाडीबीटी प्रणालीमध्ये अपलोड करावीत.
- योजनेसाठी अर्ज हा www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर करावा.
- योजनेच्या अटी व शर्तीचा भंग झाल्यास लाभार्थी वसुलीस व दंडात्मक कारवाईस पात्र राहील.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्या
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत वैयक्तिक
शेतकऱ्यांना लाभ घेता येईल.
- शेतकऱ्यांचे
स्वतःच्या नावावर ७/१२ असणे आवश्यक आहे. जर ७/१२ उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त
खातेदार असेल, तर सर्व
खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक राहील.
- जमीन कूळ
कायद्याखाली येत असल्यास, ७/१२
उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबवण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक
राहील.
- दि.
३१.१२.२०२५ पर्यंत महाडीबीटीवर प्राप्त झालेल्या अर्जांमधून सर्वसाधारण, अनु. जाती, अनु. जमाती, महिला व दिव्यांग यांची निवड लॉटरी पद्धतीने होईल.
समाविष्ट पिके:
आंबा, काजू, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, संत्रा, मोसंबी, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, चिकू इ.
पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
- शेतकऱ्यांनी
जमीन तयार करणे, माती व
शेणखत/सेंद्रिय खत मिश्रणाने खड्डे भरणे, रासायनिक खते देणे, आंतरमशागत करणे, काटेरी झाडांचे कुंपण करणे, ही कामे स्वखर्चाने करायची आहेत.
- तर खड्डे
खोदणे, कलमे/रोपे
लागवड करणे, पीक
संरक्षण, नांग्या
भरणे, ठिबक
सिंचनाद्वारे पाणी देणे ही कामे १०० टक्के अनुदानीत आहेत.
- या
योजनेकरिता लाभ क्षेत्र मर्यादा किमान ०.१० हे. ते कमाल १०.०० हे. क्षेत्र
इतकी आहे. कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थी त्यांच्या इच्छेनुसार एकापेक्षा
जास्त फळपिके लागवड करू शकतील.
- महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या
योजनेचा दोन हेक्टरपर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरित क्षेत्राकरिता (स्व.)
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमधून लाभ घेता येईल.
- लाभार्थ्यांचे
यापूर्वी राज्य रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड व अन्य योजनेअंतर्गत
लाभ घेतला असल्यास, घेतलेले
क्षेत्र वगळून उर्वरित कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभार्थी पात्र राहील.
अर्जादाराची नोंदणी व आधार प्रमाणीकरण करून सर्व इच्छुक
शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल. आपले आधार
क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. तथापि ही प्रक्रिया शेतकऱ्यांनी एकदाच
करावी लागणार आहे. (स्व.) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच ठिबक सिंचन या
बाबीकरिता www.mahadbtmahait.gov या
संकेतस्थळावर वेगवेगळे अर्ज करावेत.
सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी या कार्यालयास संपर्क साधावा.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०२५-२६ मध्ये सुरू असून, योजनेतून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ
घेण्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा